www.vishwapaavan.com हे संकेतस्थळ श्रीसमर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या उंब्रज मठाचे अधिकृत संकेतस्थळ आहे. उंब्रज मठाविषयी भाविकांना माहिती व्हावी, या उद्देशाने या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे.  

विश्वपावन हे मारुतीरायांचे एक नाव आहे. हेच नाव या संकेतस्थळाला देण्यात आले आहे. या संकेतस्थळावर अकरा मारुती, उंब्रज मठ, उंब्रज मठाची गुरुशिष्य परंपरा, मठाचे आद्य मठपती श्रीकेशवस्वामी यांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. मठामध्ये वेळोवेळी होणारे कार्यक्रम, नवनवीन उपक्रम याबाबत संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

आपले अभिप्राय संपर्क या टॅबमध्ये दिलेल्या ई-मेल आयडीवर कळवावेत. या संकेतस्थळाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.